नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) २०२१ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा प्रवास संपला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ चौथ्या स्थानावर राहिला. आयपीएलनंतर कर्णधार विराट आता आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे. आरसीबी संघाचा कर्णधार म्हणून विराटचा हा अखेरचा आयपीएल सिझन होता. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणूनही विराटचा हा शेवटचा टी ट्वेंटी विश्वचषक असेल. टी ट्वेंटी विश्वचषकानंतर विराट कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे.
कोरोना महामारीमुळे क्रिकेट खेळाडूंना बायो बबलमध्ये राहून क्रिकेट खेळावे लागत आहे. विराटने ट्विटरवर एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्याने बायोबबलमध्ये राहून खेळाडूंवर काय परिणाम होतात हे मिश्किल पद्धतीने समजावून सांगितले आहे. या फोटोमध्ये विराट एका खुर्चीवर बसला आहे आणि त्याला दोरीने बांधले आहे. बबलमध्ये खेळण्याचा असाच काहीसा अनुभव असतो, असे विराटने फोटो कॅप्शन दिले आहे. त्यावर फॅन्सनी अनेक मिम्स बनविले आहेत. तर काही फॅन्सनी त्याला ट्रोलही केले आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अद्याप कोणतीही आयसीसी चषक जिंकलेला नाही. तसेच आयपीएलमध्येही त्याच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने एकदाही आयपीएल कप जिंकलेला नाही. विराट कर्णधार असताना भारत २०१९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. आयसीसी जागतिक कसोटी चषक स्पर्धेच्याही अंतिम सामन्यात पोहोचला होता. परंतु चषक मिळविण्यास त्याला अद्याप यश आलेले नाही.
https://twitter.com/imVkohli/status/1448898761250381824