इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंदूर कसोटी संपल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले. दोघांनीही भस्मारतीमध्ये भाग घेतला आणि गर्भगृहात पूजाही केली. महाकाल मंदिरात देशभरातून व्हीआयपी भाविकांची गर्दी होत आहे.
टीम इंडियाचा कर्णधार असलेला स्टार फलंदाज विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मासह पहाटे महाकाल मंदिराच्या भस्म आरतीला हजेरी लावण्यासाठी आले होते. यावेळी दोघांनीही मंदिराच्या नंदी मंडपात सुमारे दीड तास बसून भस्म आरती करून देवाचे आशीर्वाद घेतले. आरती झाल्यानंतर दोघांनीही मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज पहाटे महाकाल मंदिरात पोहोचले. जिथे दोघांनी पहाटे ४ वाजता होणाऱ्या भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन महाकालचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर विराटने मीडियाला जय महाकाल म्हटलं, तर अनुष्का म्हणाली की महाकाल मंदिरात येऊन भगवान महाकालचा आशीर्वाद घेणं खूप छान वाटलं.
https://twitter.com/Sisodia19Rahul/status/1631848474583998464?s=20
नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहणारे विराट आणि अनुष्का भक्ती आणि अध्यात्माच्या वातावरणात रमताना दिसले. विराटने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ घातली होती. तसेच डोक्यावर चंदनाचे मोठे त्रिपुण असलेले धोतर घातले होते. अशाच पोशाखात ते बसले होते. भगवान महाकालाचे ध्यान त्यांनी केले. त्याचवेळी अनुष्का शर्माही साडीत दिसली. यादरम्यान ती भगवान महाकालच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली.
https://twitter.com/mufaddel_vohra/status/1631865301934678019?s=20
याआधी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा नीम करौली यांच्या आश्रमात पोहोचले होते. वृंदावनात दोनच दिवस राहिले. यानंतर ते आनंदमाई आश्रमात पोहोचले होते, तेथे त्यांनी संतांची भेट घेतली होती. विराट कोहलीने इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात २२ तर दुसऱ्या डावात १३ धावा केल्या. यापूर्वी दिल्ली आणि नागपूर कसोटीतही त्याची अशीच अवस्था झाली होती. अशा स्थितीत विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी देवाच्या दारात पोहोचला आहे.
Virat Kohli Anushka Sharma Ujjain Mahakal Darshan Today