इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात आणि धूमाकूळ घालतात. सामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो. आनंद महिंद्रा जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. उद्योगाच्या कामांमध्ये प्रचंड व्यस्त असूनही आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांच्याद्वारे शेअर केलेले ट्विट लोकांचे खूप मनोरंजन करतात. आनंद महिंद्रांना जेव्हा काही विशेष गोष्ट दिसते तेव्हा ते त्वरित ट्विटरद्वारे नागरिकांशी शेअर करतात. आता आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण नक्कीच एन्जॉय कराल.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना खेळात खूप रस आहे. आनंद महिंद्रा हे नेहमी ट्विटरवर खेळाशी संबंधित पोस्ट करत असतात. अशीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली. या पोस्टमध्ये महिंद्रा यांनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. यासोबतच त्यांनी एका मुलाचा व्हिडिओ शेअर करून त्या मुलाला पुढे आणण्याबाबत बोलले आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुल रस्त्याच्या वेगवेगळ्या उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विट करत महिंद्रा यांंनी लिहिले आहे की, ‘CWG 2022 मध्ये सुवर्णपदकांच्या लायलुटीनंतर (सोन्याच्या पावसानंतर ) टॅलेंटची पुढची पिढी तयार केली जात आहे. याचे समर्थन कोणी करत नाही. आम्हाला या प्रतिभेचा वेगवान मागोवा घ्यावा लागेल.’ महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, त्रिरुनेलवेली गावाजवळ असलेल्या एका मित्रानं हा व्हिडीओ त्यांना पाठवला आहे. महिंद्रा यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1556889859335553024?s=20&t=b1lQm5Dd2REZRFFcoIJ_5Q
दरम्यान, नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं अप्रतिम कामगिरी करत 90 मीटरचा टप्पा ओलांडत सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल नीरजने अर्शदचे अभिनंदन केले. महिंद्रा यांनी यावर आनंद व्यक्त केला आणि जग असे असले पाहिजे असे लिहिले आहे. या भाऊबंदकीसाठी त्यांनी दोन्ही खेळाडूंना सुवर्णपदक मिळवून दिल्याची चर्चा होती.
महिंद्रा यांनी नीरजच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले. “जग हे असेच असावे. स्पर्धात्मकता आणि शत्रुत्व यातील फरक सांगितल्याबद्दल दोघांना सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद वाटतो. त्रिरुनेलवेली गावाजवळ असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या एका मित्राने हा व्हिडीओ त्यांना पाठवला आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुल रस्त्याच्या वेगवेगळ्या उड्या मारताना दिसत आहे.
Viral Video Social Media Small Child sports
Industrialist Anand Mahindra Tweet