इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमध्ये साईबाबच्या मुर्त्या हलवण्यात आल्यामुळे राज्यभर त्याचे पडसाद पडत असतांना आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
त्यांनी म्हटले की, साई बाबा हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. शिर्डी असो किंवा गावातील साईमंदिर भक्त श्रध्देने साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात.
आणि भाजपची सत्ता असलेल्या युपी मध्ये मंदिरातून साई बाबांच्या मूर्त्या हलवण्यात येत आहे. एक भक्त म्हणून माझी सुद्धा साई बाबांवर अपार श्रद्धा आहे. आपल्या देवतांचा होणारा अपमान आता भाजप नेत्यांना दिसत नाही का? तरी भाजपचे नेते गप्प का ?
महाराष्ट्रातील जनता अजूनही श्रद्धा आणि सबूरी ठेवून आहे. मात्र आगामी निवडणुकीत साई भक्तांचा रोष महायुतीला दिसेल हे नक्की.