मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची ३० ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९६७ उमेदवारांपैकी ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी (३१ ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.