मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा चौदावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन विधानभवनात प्रवेश केला आणि पायर्यांवर ठाण मांडत जोरदार निदर्शने केली.
आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीठग्रस्तांना नुकसान द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे…
अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.
https://twitter.com/NCPspeaks/status/1637703894275956736?s=20