इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
याची तयारी ठेवली पाहिजे
संपूर्ण प्रामाणिकपणा ही अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वतःबद्दल कोणतीही (मोठेपणाची) बढाई मारता कामा नये. ‘ईश्वरा’पासून, स्वतःपासून किंवा ‘सद्गुरू’पासून काहीही लपवून ठेवता कामा नये. स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या (सर्व)गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ‘ईश्वर’प्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे याची व्यक्तीने तयारी ठेवली पाहिजे.