इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो
– विचार पुष्प –
या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो
पुष्कळ गोष्टी अशा असतात, ज्या आपण दुर्लक्ष करण्यासारख्या समजतो. पण वस्तुतः आत्मोन्नतीच्या कामी त्या सहायकारी असतात किंवा त्या आत्मोन्नतीस चांगलाच अडथळा निर्माण करीत असतात. ज्या गोष्टी आपल्या विवेकास मान्य नाहीत अशा गोष्टी नाइलाजाने करीत रहाणे, आवडीनिवडींना वागण्यात प्राधान्य देणें, स्वमतांचा आग्रह धरून त्या बाजूनेच विचार करणे व बोलणे, दुसऱ्याच्या कृतींबद्दल अभिप्राय बनविणे आणि अपेक्षा नसताना दुसऱ्याजवळ व्यक्त करणे या गोष्टी साध्या वाटल्या, तरी ज्याला पूर्णत्वाच्या मार्गावर पुढे पुढे जावयाचे आहे त्याने त्यांचा फार गंभीरपणें विचार करणे अगत्याचे आहे. त्या प्रगतीच्या मार्गावरील खाचखळग्यांप्रमाणे आहेत. त्यांना हरप्रयत्नानें आपण ओलांडलेच पाहिजे.