विचार पुष्प : अखिल विश्वच दुःख, यातनांपासून मुक्त होईल
जीवनातील खरी गोडी चाखावी व ते मंगलमय व्हावे, असे सर्वांनाच वाटते. खरे सुख लाभून भगवत्प्राप्तीच्या व भगवंताच्या प्रकटीकरणाच्या ध्येयाआड येणारी विघ्ने दूर व्हावीत यासाठी भगवंताला सतत शरण राहून सर्व व्यवहार सांभाळले पाहिजेत. भगवंताच्या समीप, त्यांच्याच साक्षीने आपण सर्वकाही करीत आहोत या भावनेने, त्याच्या मार्गदर्शनावर आणि सामर्थ्यावर भरवसा टाकायला हवा. कोणत्याही प्रसंगात सदा आनंदी, संतोषी, समत्वयुक्त राहिले पाहिजे. अज्ञान, असत्य व कठोरता यापासून आपले अंतःकरण अलिप्त राखले पाहिजे. अशा प्रकारच्या साधनेने सर्वसिद्धि दायक प्रभुकृपा आपणाकडे वळेल; भवबंधन तोडणारे ज्ञानशस्त्र आपणांस लाभेल. नित्य-कर्मद्वारा, विश्वामध्ये लपलेल्या वासुदेवाची सेवा हातून घडेल. अखिल विश्वच अज्ञानापासून दुःखयातनांपासून मुक्त जाईल.
Vichar Pushpa World Sad Free