विचार पुष्प – कामातला आनंद मिळण्यासाठी
साध्यासुध्या वाटणाऱ्या कामांनाही दिव्यता देता येते, या गोष्टीचा पुष्कळवेळा आपणास विसर पडतो. एखाद्याला अभिनंदपर चार ओळी लिहिणे, प्रेमपूर्वक भेट देण्यासाठी एखादा सुंदर रुमाल निवडणे, आपणास अप्रिय असलेल्यांशी महत्त्वाच्या कामावर विचारविनिमय करणे, घरगुती कामात वा साध्या वाटणाऱ्या गोष्टीतच बराच वेळ खर्च करावा लागणे, या अशा गोष्टींतूनच या जगात सुख व आनंद वाढविण्याच्या परमेश्वरी संकल्पास आपण मूर्त करू शकत असतो. हे जर ध्यानात आले तर हीच कामे पूर्वीपेक्षा कितीतरी आनंदायक ठरतील! घासून पुसून साफ केलेले व आपणास हवा असलेला आकार दिलेले असेच काम आपल्या हाती येईल अथवा यावें असें कां समजतां? अशी आशा का धरता? तुमच्याकडे कोणतेही काम येईल, ते काम किती तन्मयतेने तुम्ही करता हेच महत्त्वाचे आहे.
Vichar Pushpa To get Happiness