इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर तुम्ही विचलित होणार नाही
व्यक्तीच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या अनुभवांची योग्यता अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात आणि अद्भुत असे अनुभव रचतात. आणि ते अशी कल्पना करू लागतात की, त्यांना तसे अनुभव (खरोखरच) आले आहेत. मी त्यांच्याबाबत येथे काही बोलू इच्छित नाही. पण जे लोक प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात त्यांच्याबद्दल सांगायचे तर, जेव्हा तुम्हाला ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती मिळते, त्याच्या उपस्थितीची जाणीव होते तेव्हा सर्व जगाने जरी सांगितले की, ‘तुमचा तो अनुभव खरा नाही’, तरी त्यामुळे तुम्ही यत्किंचितही विचलित होत नाही.