इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर परमेश्वराजवळ क्षमा मागा
तुमच्या सहवासात असलेल्यांना अथवा सहकाऱ्याना वाईट लागेल वा वाईट वाटेल असे वर्तन तुमच्याकडून न होवो. तसे वचन न बोलले जावो. समजा, कधी अजाणता अनवधानामुळे तुमचे वर्तन कठोर झाले, तर मनोमन त्याबद्दल परमेश्वराजवळ क्षमा मागा. तेवढे करूनही, ज्या अहंकारामुळे तुमच्याकडून असे हे प्रमाद घडतात तो अहंकार कांही नमत नाही म्हणून एक उपाय करून पहा : जर त्या दुसऱ्या व्यक्तीशी तुमचा निकटचा परिचय असेल, तर त्याला एकांतात घेऊन विश्वासपूर्ण अंतःकरणाने, घडलेल्या प्रमादाबद्दल त्याच्या जवळ योग्य तेवढ्या मोजक्या शब्दांत दिलगिरी व्यक्त करा. यायोगे तुमच्या अहंकाराची धार जरा तरी झिजेल व पुढे प्रसंग येईल तेव्हा तुम्ही जरा तरी सावध रहाल. ‘अव्यक्त आणि अंशभूत व्यक्त’ अशा दोन्हीही परमेश्वरासमोर तुम्ही क्षमयाचना करणे अगत्याचे आहे. नेहमीच मृदु वचन बोलावे आणि सभ्य वर्तन करावे.