इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
नटलेले सौंदर्य म्हणजे…
बाह्य सौंदर्याचे दर्शन घडताच लक्षात घ्या की, हे नटलेले सौंदर्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अंतःकरणामध्ये निवास करत असलेल्या आत्म्याच्या ऐश्वर्याचा तो बाह्य आविष्कार आहे. सौंदर्य-दर्शन झाले की म्हणावे : परमेश्वरा, सुन्दरतम अशा तुझ्या स्वरूपाचीच ही सुन्दर प्रतिबिंबे मी पहात आहे. सर्वमंगल – मांगल्य – सागरातील एकेका अमृत बिंदूचे दर्शन हेच मला सौंदर्यदर्शन घडवीत आहे. शाश्वत, सुन्दर व मंगलमय परमेश्वराचे स्मरण करून देणारे वस्तुजात मला आनन्दसागराप्रमाणेच नाही काय ? परमेश्वरा, या सुन्दर जगांत मी आहे, हे माझें केवढे भाग्य ! तुझ्या दर्शनाचा शाश्वत आनन्द मला सततचा लाभू दे, हे एकच मागणे.