विचार पुष्प – ….म्हणूनच जगात दुःख आहे
सर्वत्र भिंतीच भिंती! त्यांचाच अंमल दिसत आहे. त्यातून मला नीटपणे बाहेर पडू दे, वाट सापडू दे. मानव हा कुंपणप्रिय प्राणी. सभोवती मनाची, जातीची, व्यवसायाची, पंथाची, धर्माची, ज्ञानाची, कर्माची, अशा अनेक प्रकारच्या भिंती त्याने उभारल्या आहेत; शृंखलाच आहेत त्या. म्हणूनच जगात दुःख आहे. मला या भिंतींच्या पलीकडे नजर टाकण्यास, बंधनांतून वर उठण्यास समर्थ होऊं दे.
“हे बलवंता, दुर्बलांना मदत करण्याचे सामर्थ्य मला दे. परमेश्वरा, वाईटात दडलेले चांगले पाहणारी दृष्टी मला दे. देवा, माझा असा बुद्धिपालट होऊ दे की ज्यायोगे मला तिरस्कृत जीवनातहिीआनंद आणि दुःखांतही सुख लाभेल. हे प्रियतम देवा, पराधीन असा मी स्वाधीन होवों आणि माझ्या सामान्य जीवनास दिव्यत्व प्राप्त होवो.” अशी निरंतरची प्रार्थना तुमच्या हृदयी असूं द्यावी.
(संकलित)
Vichar pushpa Mhanunach Jagat Dukha Aahe