विचार पुष्प
हो, कितीतरी गोष्टी वास्तविक क्षुल्लकच असतात!
मनाला वैताग आणणाऱ्या, त्याचा तोल घालविणाऱ्या कितीतरी गोष्टी वास्तविक क्षुल्लक असतात. कोणी टाकून बोलते असें उगीच वाटून हुरहुर लागते. कोणी लक्ष देत नाही असे वाटून अस्वस्थता येते. अशा स्थितीत सदा आनंदी कसे राहता येणार? प्रश्न बरोबर आहे, पण लक्षात ठेवा, तुमच्या सभोवतालची परिस्थिती ही दीर्घ कालाच्या कारणपरंपरेचा परिणाम आहे. तिच्यात तुम्ही म्हणाल तसा व तेव्हा बदल होण्याचा संभव नाही. बदल करण्याचे सामर्थ्य आहे, पण अल्प प्रमाणात. बदल सावकाशच होणार. तोवर सर्वांस धैर्याने तोंड देत राहणे अटळ आहे. कधी जय, तर कधी पराजय! काळजी व असंतोष तुम्हांस काय देणार? हा न्याय सर्वांनाच लागू आहे. इतरांविषयी मत्सर मग कशाला? धैर्याने तोंड देणे, न कुरकुरणे हाच एकमेव मार्ग आहे.