बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात तुटले; अग्नीवीर होण्याचे स्वप्न भंगले

by India Darpan
सप्टेंबर 16, 2022 | 9:51 pm
in क्राईम डायरी
0
Capture 41

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील कणा असलेल्या एसटी बसची दुरवस्था नेहमीच चर्चेत असते. गळक्या, खिडक्या नसलेल्या, खिडक्या बंद असलेल्या, भरपूर धूर ओकणाऱ्या, नादुरुस्त आणि विविध समस्यांनी ग्रस्त अशा बसेस आपण नेहमीच पाहतो. पण, एका एसटी बसमुळे दोन तरुणांचे चक्क हातच तुटले आहेत. त्यामुळे ही बाब संपूर्ण राज्यातच चर्चेची ठरली आहे.

धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत. आज सकाळी (१६ सप्टेंबर) ही घटना घडली आहे. दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरुवातीला मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यानंतर त्यांना जळगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मलकापूर आगारातील बस पहाटे साडेपाच वाजता मलकापूरहून पिंपळगावदेवी येथे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी पिंपळगावदेवी आणि मलकापूर दरम्यान काही तरुण हे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. हे तरुण रोज या ठिकाणी व्यायाम करतात. भारतीय संरक्षण दलात जाण्यासाठी म्हणजेच अग्नीवीर होण्यासाठी हे तरुण तयारी करीत होते. त्याचवेळी एक एसटी भरधाव वेगाने तेथून गेली. याच बसचा धक्का या तरुणांना लागला. बस चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागला आणि दोन तरुणांचे थेट हातच कापले गेले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून रस्त्यावर पडले. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली.

विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील या दोन्ही तरुणांचे हात कापले गेले आणि ते ५० ते ६० फूट अंतरावर जाऊन पडले. अपघात लक्षात येताच चालकाने बस थांबविली पण त्यानंतर तो निघून गेला. मात्र ही घटना स्थानिक ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी या दोन्ही तरुणांना मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.  मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात दाखल झाला आहे.

दरम्यान, संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल रहिवाशांनी विचाराला. कारण एखादी एसटी बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तिची तपासणी केली जाते. परंतु संबंधित बसचा पत्रा बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर पडली आणि पुढील दुर्घटना घडली. या घटनेचा जाब विचारण्यासाठी २०० जणांचा जमाव इथे होता. त्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी संबंध बसचालकावर कारवाईची मागणी केली आहे.

ST Bus Major Accident 2 Youth Hand Cut
Buldhana

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचा आज होईल गुणगौरव; जाणून घ्या, शनिवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

विचार पुष्प – हो, कितीतरी गोष्टी वास्तविक क्षुल्लकच असतात!

India Darpan

Next Post
Vichar Pushpa e1661943624606

विचार पुष्प - हो, कितीतरी गोष्टी वास्तविक क्षुल्लकच असतात!

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011