इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…ही अत्यंत दुर्मिळ बाब
‘ईश्वरा’प्राप्ती बद्दलच्या व्याकुळतेविरोधी असा एखादाही भाग जोपर्यंत आपल्यामध्ये असतो तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजे स्पष्टच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही अत्यंत दुर्मिळ अशी बाब आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीतील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची ती व्यक्ती काळजी घेते, व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते. ….हा सर्व अप्रामाणिकपणा आहे. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी भगवंताच्या ‘उपस्थिती’ची चेतना असते, दिव्य ‘संकल्पा’ची चेतना असते आणि जेव्हा व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जणू काही दीप्तीमान, निरभ्र, शुद्ध, संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य ‘अस्तित्वा’चा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा येतो. तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.