इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हे बदल तुम्हाला दिसतील
तुमच्या परिस्थितीत एकसारखे बदल होत असलेले तुम्हाला दिसतील. काही दिवस कष्टाचे, तर काही विश्रांतीचे. कधी प्रकृति नादुरुस्त, तर कधी उत्साहाचे भरतें आलेले. कधी स्वकीयांकडून, तर कधी परकीयांकडून तुमच्या मार्गांत काटे पसरले जातात आणि कधी सर्वत्र सहानुभूतीचा अनुभव येतो. अशारीतीने आपण सततच परिस्थितीचे गुलाम बनून राहिलेले असतो. पण तुमच्या अंतःकरणात परमेश्वराचे स्थान अचल असेल, तर कोणताही बांका प्रसंग तुमच्यावर अनिष्ट परिणाम करू शकणार नाहीं. आणि जीवनांतील कोणत्याही उलथापालथीने तुम्ही विचलित होणार नाही. प्रत्येक प्रसंगातून तुम्ही एकेक पाऊल परमेश्वराकडेच जाल. सध्या जे काही घडत आहे ते सर्व ‘त्याच्या’च इच्छेने चाललेले असून त्यातून भावी उच्चतर जीवनाचा लाभ आपल्याला होणार आहे. हे जर आपण जाणले, तर प्रत्येक प्रसंगाचा नुसता स्वीकारच नव्हे, तर सादर स्वागतच तुम्ही कराल. ही समता म्हणजेच योग आहे