India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आधी विमान… नंतर सायलेंट ट्रेन.. अमेरिकन अध्यक्ष असे पोहचले युक्रेनमध्ये… म्हणूनच रशियाला लागला नाही पत्ता…

India Darpan by India Darpan
February 21, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सोमवारी अचानक युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचून जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले. युक्रेनला पोहोचण्याची बिडेन यांची गुप्त योजना आता माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. स्टायलिश चष्मा, डिझायनर ओव्हरकोट आणि पॉलिश शूजमध्ये 20 फेब्रुवारीला कीवमध्ये पोहोचून बिडेन यांनी रशियाला मजबूत संदेश दिला. बिडेन त्यांच्या ‘सरप्राईज व्हिजिट’नंतर अमेरिकन मीडियामध्ये स्टार बनले आहेत.

असा होता गुप्त प्रवास
वॉशिंग्टनमधील लष्करी विमानतळाच्या हँगरवर सोमवारी सकाळी मध्यरात्री अचानक बिडेन यांचा दौरा सुरू झाला. जो बिडेन हवाई दलाच्या बोईंग 757 मध्ये चढले, ज्याला C-32 म्हणून ओळखले जाते. पंधरा मिनिटांनंतर, बिडेन, काही सुरक्षा कर्मचारी, एक लहान वैद्यकीय पथक, जवळचे सल्लागार आणि दोन पत्रकार एवढे जण युद्धक्षेत्रात प्रवासाला निघाले.

पत्रकारांचे फोन जप्त
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टर सबरीना सिद्दीकी यांनी उघड केले की, तिला आणि छायाचित्रकाराला पहाटे 2:15 वाजता वॉशिंग्टनच्या बाहेर जॉइंट बेस अँड्र्यूज येथे बोलावण्यात आले होते. सर्वप्रथम त्यांचे फोन जप्त करण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, 24 तासांनंतर म्हणजेच बिडेन युक्रेनच्या राजधानीत येईपर्यंत हे फोन परत केले जाणार नाहीत.

जर्मनी-पोलंड फ्लाइट
वॉशिंग्टन ते जर्मनीतील रॅमस्टीन येथील अमेरिकन लष्करी तळावर इंधन भरण्यासाठी त्यांनी सुमारे सात तास उड्डाण केले. इथेही त्यांच्या विमानाच्या खिडकीच्या काचा खालीच होत्या. बिडेन किंवा अन्य कुणीही विमानातून बाहेर आले नाही. पुढे ते पोलंडला गेले. तेथे ते रझेझो-जेसिओन्का विमानतळावर उतरले.

रात्रभराचा थरारक रेल्वे प्रवास
स्थानिक वेळेनुसार रात्रीचे 9:15 वाजले होते. जेव्हा बिडेन रात्रीच्या सायलेंट ट्रेनमध्ये चढले. त्यानंतर पत्रकारही चढले. ट्रेनमध्ये पूर्णतः सुरक्षा रक्षकच होते. युक्रेनचा हा 10 तासांचा प्रवास होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी हा वेगळाच होता. अफगाणिस्तान किंवा इराकच्या राष्ट्रपतींच्या भेटींच्या विपरीतहा दौरा होता. विशेष म्हणजे हे सक्रिय युद्धक्षेत्र आहे. तेथे हा ट्रेनने प्रवास होता. याठिकाणी सुरक्षा देण्यासाठी अमेरिकन सैन्य नव्हते.

सकाळी पोहोचले
बिडेन ज्या ट्रेनमध्ये चढले ती सकाळी 8:07 वाजता कीवमध्ये दाखल झाली. कीवमध्ये पोहचल्यावर बरे वाटले, अशी प्रतिक्रीया बिडेन यांनी दिली. याआधी, ओबामा यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्रपती पदावर असताना बिडेन यांनी युक्रेनला भेट दिली होती.

President Zelenskyy and all Ukrainians remind the world every day what courage is.

They remind us that freedom is priceless.

And worth fighting for.

For as long as it takes. pic.twitter.com/GlBT0Sg9ZL

— President Biden (@POTUS) February 20, 2023

US President Joe Biden Ukrain Visit Thrilling Journey


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हे बदल तुम्हाला दिसतील

Next Post

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रिम कोर्टाने घेतला हा निर्णय

Next Post

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रिम कोर्टाने घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group