इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हाच राजमार्ग आपणासमोर खुला आहे
भगवंताच्या हातून आपण घडले जाण्यासाठी वृत्ती कशी असली पाहिजे? मातीच्या मऊ गोळ्यासारखे आपणास राहाता आले पाहिजे. याकरता आपली इच्छा व आपल्या आवडीनिवडी दूर सारण्यास आपण शिकले पाहिजे. हे शिकण्याकरिता आपले नित्यजीवन हेच उत्तम क्षेत्र आहे. मोठमोठ्या महत्त्वाच्या प्रसंगीच फक्त स्वतःच्या इच्छेचा त्याग करणे व इतर सामान्य व्यवहारातील सामान्य गोष्टीत आपली इच्छा कामाला लावणे हा काही खरा मार्ग नव्हे. उलट नित्याच्याच लहान लहान प्रसंगात आपली इच्छा सहजरीतीने दूर ठेवण्याचा अभ्यास होऊ शकतो. मग तुम्ही नित्य ‘होय’ म्हणून, जे येईल त्याचा स्वीकार करून योग्य वृत्तीने ते पूर्णतेस नेण्याचा प्रयत्न का करीत नाही? देवाचा पूर्ण आशीर्वाद व पूर्ण कृपा संपादन करण्याचा तोच राजमार्ग आपणांसमोर खुला आहे.