विचार पुष्प
…तरंच तुमच्या जीवनामध्ये समाधान भरून राहील
स्वतःचा विचार मागे टाकून स्वार्थरहित होणे हा तर सर्व नीतीशास्त्राचा आणि धर्माचा गाभा आहे. म्हणूनच आंतरिक किंवा बाह्य स्वरूपाचा त्रास, निराशा, दुःख, अस्वस्थता, विलोभन, मूढता वगैरे नावडत्या गोष्टीशी गाठ पडली म्हणजे त्यांना दोन्ही हातांनी पकडा व धैर्याने त्यांच्याशी संघर्ष करा. परंतु त्या गोष्टींचा तिरस्कार करू नका; कारण त्या गोष्टींशी संबंध आला म्हणजेच तर ‘स्व’ विसरण्याची सुवर्णसंधी आपल्याला लाभत असते. प्राचीन संतांनी व थोरांनी, जगाने त्यांच्याकडे फेकलेल्या अशा गोष्टींचे स्वागत केले आहे. त्यांचे अनुकरण करण्यानेच तुमच्या जीवनामध्ये समाधान भरून राहील. हा समर्पणाचा मार्ग, हेच सर्व उपासनांचें, साधनांचे व धर्माचरणाचे एकमेव सार आहे. ते आचरू या.
Vichar Pushpa Great Thought Satisfaction in Life