इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
अशाच वेळी आपली परीक्षा होत असते
ईश-सेवेचे व्रत हे एक उच्चतम ध्येय म्हणून समोर ठेवल्यानंतर, मधून मधून निराशेचे व निरुत्साहाचे प्रसंग आले असतांना निरुपाय समजून स्वस्थ बसण्यांत काय अर्थ? अशाच वेळी आपली परीक्षा होत असते.
साह्यकर्त्या परमेश्वरावर श्रद्धा असेल, तर अशा प्रसंगी अगदी ऐन वेळी, म्हणजे अगदी योग्य वेळी व्रताचरणासाठी लागणारे बळ व मनोधैर्य प्रदान करून तो आपणास प्रसंगातून सुरक्षितपणे व यशस्वीरीतीने कसे पार पाडतो हे अनुभवून तर पहा!
नेहमीच जरासे कणखरपणाने वागण्याचा अभ्यास मात्र तुम्ही ठेवला पाहिजे.