इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
असेही गुरु असतात
मानवतेची सेवा करण्याची कल्पना ही महत्त्वाकांक्षेच्या अत्यंत सामान्य रूपांपैकी एक रूप आहे. अशा प्रकारच्या सेवेविषयी किंवा कार्याविषयी असणारी सर्व आसक्ती ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची खूण असते. ज्या ‘गुरुं’ची अशी समजूत असते की, त्यांच्यापाशी मानवतेला शिकविण्यासाठी एक फार महान सत्य आहे आणि ज्यांना भरपूर मोठा शिष्यवर्ग हवा असतो. … आणि पुढे शिष्य त्यांच्यापासून निघून जातात तेव्हा जे बेचैन होतात किंवा त्यांच्याकडे जो कोणी येईल त्याला पकडून ते त्या व्यक्तीला शिष्य बनविण्याचा प्रयत्न करतात, असे गुरू निःसंदेहपणे अन्य कशाचे नव्हे तर, स्वतःच्या महत्त्वाकांक्षेचे अनुसरण करत असतात.