इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
असा कोणी तुमच्या पाहण्यात आला आहे का?
उभ्या जन्मभर एखाद्याने आपल्या ध्येयासाठी रात्रंदिवस श्रद्धामय मनाने प्रयत्न केले, पण त्याला कशाचाही लाभ झाला नाही, असा कोणी तुमच्या पाहण्यात आला आहे का? वास्तविक अखंड अभीप्सेच्या अग्नीचा हृदयात वास असणे ही केवढी भाग्याची गोष्ट!
धैर्यशीलता, उदारता, सत्यनिष्ठा अशा गुणांचे परिपालन करणाऱ्याच्या जीवनात कधीतरी विफलता दिसेल का? मुळीच नाही.
योग्य व न्याय्य तेच तुम्ही करीत रहा, त्यायोगे अधिकाधिक योग्य कर्म करण्याचे तुमचे सामर्थ्य वाढेल.
तुम्ही दान करीत रहा, त्यायोगे देण्यातील आनंदाचे तुम्ही वाटेकरी व्हाल. उदारता हा गुण अंगभूत होईल. सहानुभूति व प्रेम यांचे उद्यान म्हणजे तुमचे जीवन असे होऊ दे. म्हणजे या दिव्य गुणपुष्पांच्या सुगंधाने इतरांचीही जीवने सुगंधित होतील.