इंडिया दर्पण – विचार पुष्प – ऋषी आणि साधू हे करत होते
‘अपूर्वता’ हेच जीवन. अनुकरण म्हणजे विनाश. यशाची यशस्वीरीतीने नक्कल करता येत नाही. प्रत्येक बाबतीत तुम्ही अपूर्वता दाखविली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते क्रियाशील सामर्थ्य तुमच्या ठिकाणी सुप्त आहे. तो अग्नी प्रज्ज्वलित करा.
इतरांनी आखलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वतःचा स्वतंत्र मार्ग शोधून काढा. नाविन्य प्रकट करून स्व-विकास साधा. तुमच्या कृती तुमच्याविषयी बोलू देत. जगाला शिकविता येईल असे काही ‘अभिनव’ वा ‘अपूर्व’ तुमच्या हातात असू द्या.
आपल्या ठिकाणच्या ‘अपूर्वाचा’ विकास करून प्राचीनकाळी ऋषींनीं व साधुपुरुषांनी आपले स्वतंत्र अपूर्वत्व सिद्ध केले. आपणही आधुनिक काळांतील ऋषी बनण्याची आकांक्षा बाळगू या. एक दिवस असा उजाडेल, जेव्हा तुम्ही अपूर्वतेची प्रतिभा व्हाल.