नवी दिल्ली – निवृत्तिवेतनधारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. निवृत्तिवेतनधारकांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर एसएमएस, ईमेलसह व्हॉट्सअॅपवरसुद्धा माहिती मिळणार आहे. निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात निवृत्तीवेतन जमा झाल्यानंतर एसएमस, ईमेलसोबत व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया अॅपवरही स्लिप पाठवू शकतात, आदेश केंद्र सरकारने सर्व बँकांना दिले आहेत. निवृत्तिवेतनधारकांच्या सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पेंशन अँड पेंशनर्स वेलफेअरतर्फे हा आदेश जारी केला आहे.
स्लिप महत्त्वाची का
निवृत्तीवेतन देणार्या बँकांच्या केंद्रीय निवृत्तीवेतन वितरण केंद्राची (सीपीपीसी) एका बैठक मागील महिन्यात झाली होती. या बैठकीत निवृत्तिवेतनधारकांच्या मासिक निवृत्तीवेतनाचे ब्रेकअप उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.निवृत्तिवेतनधारकांना प्राप्तीकर, महागाई भत्त्यासह इतर आवश्यक गोष्टींसाठी निवृत्तीवेतनाच्या स्लिपची गरज असते. म्हणून हे पाऊल उचलण्यास तयार झाले, असे आदेशात म्हटले आहे. या प्रकारच्या निवृत्तीवेतन वितरण करणार्या प्रत्येक बँकेला निवृत्तीवेतन क्रेडिट झाल्यानंतर स्लिप, एसएमएस आणि ईमेलद्वारे पाठवायला हवे.
स्लिपमध्ये विवरण काय
या आदेशात म्हटले की, स्लिपमध्ये मासिक निवृत्तीवेतनाचे पूर्ण विवरण असते. त्यामध्ये क्रेडिट झालेल्या रक्कम यासह कोणत्याही प्रकराचे पैसे कपात झाले असतील तर त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे निवृत्तिवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.