India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मॉरिशसच्या राजधानीत साकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा; या तारखेला होणार अनावरण

India Darpan by India Darpan
May 25, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून असंख्य सावरकर भक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये दाखल होणार आहेत.

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत मंत्री श्री.चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे. मॉरिशस म्हणजे चहूबाजूंनी हिंदी महासागराने वेढलेले पाचूचे बेट असून निसर्गाने मुक्त उधळण केलेले पर्यटन स्थळ आहे. सागरी जैव विविधता आणि पारदर्शक स्फटिकासारखे निळेशार पाणी व सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे अनुभवणे असा सुवर्णयोग जुळून आला आहे.

VD Savarkar Statue in Mauritius Capital


Previous Post

चोरट्यांनी ट्रेण्ड बदलला… बघा, नाशकात काय काय होतंय चोरी….

Next Post

पीक कर्जाबाबत सहकार मंत्र्यांनी दिले हे निर्देश

Next Post

पीक कर्जाबाबत सहकार मंत्र्यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group