इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण’च्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना आता विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळत आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी या सदराद्वारे शास्त्रोक्त माहिती दिली जात आहे.
या आठवड्याचा प्रश्न असा
मीठ व वास्तू दोष यांचा नेमका संबंध काय आहे, असा प्रश्न सुधा खैरनार, यशवंत पाटील आणि अमोल मोरे यांनी विचारला आहे.
उत्तर असे
ज्योतिष शास्त्राप्रमाणे मीठ चंद्र आणि शुक्राला दर्शवतं म्हणून मीठ स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवलं तर चंद्र आणि शनी मिलन आपल्यासाठी घातक आहे असे सिद्ध होईल. कारण स्टील आणि लोखंड हे धातू शनी संबंधित असतात आणि चंद्र शनिचा विष योग होतो.
– स्टील, लोखंड यात मीठ ठेवणे रोग, शोक यासाठी कारणीभूत ठरतं. या संपर्कात येणार्या व्यक्तीला मानसिक ताण जाणवतं.
– प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवल्याने पैसा आजारावर खर्च करण्यात, तसेच उधारी वापसी न आल्यामुळे टिकत नाही.
– मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवणे योग्य ठरेल.
– मीठ सांडल्यामुळे चंद्र कमजोर होतं. याने वाद वाढतात.
– मीठ कुणाच्याही हातात देणे टाळावे. मिठाचा डबा, मिठाची पिशवी देखील हातात देऊ नये. याने आपसातील संबंध बिघडतात.
– भोजन तयार करताना पदार्थ चाखून बघू नये. याने दारिद्र्य येतं.
– मीठ व तेल कधीच जवळ किंवा एकत्र ठेवु नये, नाहीतर! पती-पत्नी मध्ये नेहमी मतभेद,भांडण,वादविवाद होतात…..
– नापसंत किंवा अप्रिय व्यक्तीच्या घरातील मीठ कधीच खाऊ नये. याने त्याच्यातील वाईट गुण, विचार, सवयी, व्यवहार आपल्यात येतो…….
– दुर्योधनाच्या घरातील खाऊन पितामह भीष्म सुद्धा बदलू शकतात तर आपल्या सारख्या सामान्य माणसाचे काय म्हणून विचार करावा.
वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.
वास्तू तज्ज्ञ प्रशांत चौधरी यांच्याविषयी…
वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.