इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या इंडिया दर्पणच्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव नवे सदर सुरू करण्यात आले आहे. वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळत आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी आता शास्त्रोक्त माहिती दिली जात आहे.
या आठवड्याचा प्रश्न असा
इंडिया दर्पणचे वाचक श्री भीमा ठाकरे व श्री गणेश पाठक यांनी देवघरातील टाक पिंड व दोन मूर्ती याविषयी प्रश्न विचारले आहेत.
उत्तर – देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा टाक व पूर्वजांचा टाक हा एकत्र ठेवू नये कुलदेवतेचा टाक हा वरती व पूर्वजांचा टाक हा देवघराच्या सर्वात खाली ठेवणे योग्य आहे त्याचप्रमाणे देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवली तरी चालते पण ती पिंड खूप मोठी असू नये आपल्या अंगठ्याच्या उंचीची छोटीशी पिंड ठेवावी त्याचप्रमाणे एकाच देवतेच्या दोन मुर्त्या असू नये जर त्या असल्यास एक मूर्ती आपल्या भाऊबंदकी मध्ये असलेल्या लोकांना किंवा मग शक्य नसल्यास ती विसर्जन करणे उत्तम
घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये छोटे छोटे झाडे आपण लावू शकतो दक्षिण आणि पश्चिम मध्ये आपण उंच झाडांचा विचार करू शकतो ज्या झाडांना रोपट्यांना काटे असतात ज्या झाडांमधून चिक निघतो असे झाड किंवा रोपटे घरामध्ये ठेवू नये याला गुलाबाचे झाड अपवाद आहे रुद्राक्षाचे रोपटे सुद्धा घरात ठेवू नये,
आपल्या घरामध्ये रंग देतेवेळी काळा कलर, निळा कलर ,आणि लाल कलर, यांचा वापर शक्यतो टाळावा याव्यतिरिक्त आपण आपल्या डोळ्यांना जे पण कलर चांगले वाटतात ते कलर लावल्यास चांगला फायदा पाहायला मिळतो फक्त रंग जे आहेत ते अतिशय डार्क भडक नसावेत एकदम डोळ्याला शांतपणा देतील असेच फिकट व जास्तीत जास्त उजेड देणारे निवडावेत
वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.
वास्तू तज्ज्ञ प्रशांत चौधरी यांच्याविषयी
वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.
Vastu Shanka Samadhan devghar Details