वसंत पंचमी
माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमीबाबत पौराणिक कथा अशी आहे की, ब्रह्मदेवाने सृष्टीचे निर्माण केल्यानंतर देखील या सृष्टीमध्ये ज्ञानरूपी चैतन्य जाणवत नव्हते. त्यामुळे ब्रह्मदेवाने ज्ञानाची देवी शारदा अर्थात सरस्वतीची निर्मिती केली. शारदा देवी अर्थात सरस्वती ही ज्ञान, विद्या आणि बुद्धी याची देवता आहे. ज्ञानाची देवता शारदा सरस्वती ही भूतलावर अवतीर्ण होऊन तिच्या हातात असलेल्या सतार या वाद्याचे झंकार संपूर्ण पृथ्वीवर पसरले. त्यामुळे समस्त विश्वात चैतन्य लहरी निर्माण झाल्या. तोच आजचा वसंत पंचमी हा दिवस होय.
![Dinesh Pant e1610813906338](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2021/01/Dinesh-Pant-e1610813906338-296x300.jpg)
व्हॉटसअॅप – 9373913484
बोचरी थंडी संपून अल्हाददायक उन्हाचे वातावरण वसंत पंचमी पासून सुरू होते. निसर्गातील समस्त वृक्षांची जुनी पालवी जाऊन नवी कोवळी पालवी येत असते. मुख्यतः सरस्वतीपूजन हे या दिवशी महत्त्वाचे असते. यंदाच्या वसंत पंचमीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, बुधादित्य योग, केदार योग, कुमार योग असे पाच योग एकत्र येणार आहेत. त्यामुळे यंदाची वसंत पंचमी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. आजच्या दिवशी विविध शुभ कार्यांना प्रारंभ करावा असा शास्त्रार्थ आहे. विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीचे पंचोपचार पूजन अर्थात पुस्तक पूजन अवश्य करावे. पूजन झाल्यानंतर देवीला पिवळा पुष्प, केशर, भात, पिवळा लाडू, मध याचा नैवेद्य दाखवून आरती करावी.
यावेळची पंचमी तिथी 5 फेब्रुवारीला पहाटे 03:47 पासून 6 फेब्रुवारीला पहाटे 03:46 पर्यंत आहे.
सरस्वती पूजन मुहूर्त 5 फेब्रुवारीला पहाटे 7 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत आहे.