India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वंदे भारतने तोडला बुलेट ट्रेनचा विक्रम; अवघ्या ५१ सेकंदात गाठला १०० किमीचा वेग

India Darpan by India Darpan
September 10, 2022
in मुख्य बातमी
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ​​तिसऱ्या आणि नवीन वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रन दरम्यान केवळ ५२ सेकंदात तब्बल १०० किमी प्रतितास वेग गाठून बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. याशिवाय, फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टीम ही नवीन वंदे भारत ट्रेनला कोरोनासह सर्व वायुजन्य आजारांपासून मुक्त ठेवेल, असेही ते म्हणाले. भारताची ही सेमी-हाय स्पीड ट्रेन येत्या काही आठवड्यांत अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावण्यासाठी तयार आहे.

ट्रायल रनचा निकाल जाहीर करताना रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, “वंदे भारत ट्रेनची तिसरी ट्रायल गुरुवारी पूर्ण झाली. तिने ०-१०० किमी प्रतितास वेग ५२ सेकंदात पूर्ण केला, तर बुलेट ट्रेनला हा वेग गाठण्यासाठी ५४.६ सेकंद लागले. या नव्या ट्रेनचा कमाल वेग १८० किमी प्रतितास आहे. जुन्या वंदे भारतचा कमाल वेग १६० किमी प्रतितास आहे. या ट्रेनमध्ये आरामदायी प्रवासासाठी अनेक वैशिष्ट्ये आहेत. गुणवत्ता आणि सवारी निर्देशांकात सुधारणा झाली आहे. या पॅरामीटर्सवर ट्रेनचा स्कोअर ३.२ आहे तर जागतिक स्तरावर सर्वोत्तम स्कोअर २.९ आहे.

Vande Bharat Express train at Mumbai Central. Exteriors. pic.twitter.com/OSKEbxG3rl

— Rajendra B. Aklekar (@rajtoday) September 9, 2022

नवीन एसी प्रणाली
फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर प्रणाली ही नवीन वंदे भारत ट्रेनला कोरोनासह सर्व वायुजन्य आजारांपासून मुक्त ठेवेल. रेल्वे मंत्रालय पायलट प्रोजेक्ट म्हणून नवीन वंदे भारतमध्ये ही अँटी-व्हायरस यंत्रणा बसवणार आहे. यश मिळाल्यानंतर, ही योजना प्रीमियम राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि रेल्वेच्या इतर गाड्यांसह सर्व ४०० वंदे भारत ट्रेनमध्ये लागू केली जाईल. ट्रेनची अंतिम चाचणी पूर्ण झाली असून तिचा मार्ग आणि धावण्याची घोषणा लवकरच केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद-मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत ही ट्रेन सुरू केली जाऊ शकते.

Trail run of Vande Bharat Express between Ahmedabad & Mumbai on @WesternRly @fpjindia pic.twitter.com/HB4TsEUpCe

— Kamal Mishra (@Yourskamalk) September 9, 2022

Vande Bharat Train Trail Successful
Mumbai Ahmedabad 100KM Speed Bullet Train


Previous Post

खासदार फोडण्यासाठी शिंदेचे प्रयत्न ठरले अपयशी; असे घडले सर्व नाट्य

Next Post

आयफोन घेण्यास इच्छुक आहात? भारतामध्ये आता स्वस्तात मिळणार नाही

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

आयफोन घेण्यास इच्छुक आहात? भारतामध्ये आता स्वस्तात मिळणार नाही

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group