मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिसऱ्या आणि नवीन वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रन दरम्यान केवळ ५२ सेकंदात तब्बल १०० किमी प्रतितास वेग गाठून बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. याशिवाय, फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टीम ही नवीन वंदे भारत ट्रेनला कोरोनासह सर्व वायुजन्य आजारांपासून मुक्त ठेवेल, असेही ते म्हणाले. भारताची ही सेमी-हाय स्पीड ट्रेन येत्या काही आठवड्यांत अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावण्यासाठी तयार आहे.
ट्रायल रनचा निकाल जाहीर करताना रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, “वंदे भारत ट्रेनची तिसरी ट्रायल गुरुवारी पूर्ण झाली. तिने ०-१०० किमी प्रतितास वेग ५२ सेकंदात पूर्ण केला, तर बुलेट ट्रेनला हा वेग गाठण्यासाठी ५४.६ सेकंद लागले. या नव्या ट्रेनचा कमाल वेग १८० किमी प्रतितास आहे. जुन्या वंदे भारतचा कमाल वेग १६० किमी प्रतितास आहे. या ट्रेनमध्ये आरामदायी प्रवासासाठी अनेक वैशिष्ट्ये आहेत. गुणवत्ता आणि सवारी निर्देशांकात सुधारणा झाली आहे. या पॅरामीटर्सवर ट्रेनचा स्कोअर ३.२ आहे तर जागतिक स्तरावर सर्वोत्तम स्कोअर २.९ आहे.
Vande Bharat Express train at Mumbai Central. Exteriors. pic.twitter.com/OSKEbxG3rl
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) September 9, 2022
नवीन एसी प्रणाली
फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर प्रणाली ही नवीन वंदे भारत ट्रेनला कोरोनासह सर्व वायुजन्य आजारांपासून मुक्त ठेवेल. रेल्वे मंत्रालय पायलट प्रोजेक्ट म्हणून नवीन वंदे भारतमध्ये ही अँटी-व्हायरस यंत्रणा बसवणार आहे. यश मिळाल्यानंतर, ही योजना प्रीमियम राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि रेल्वेच्या इतर गाड्यांसह सर्व ४०० वंदे भारत ट्रेनमध्ये लागू केली जाईल. ट्रेनची अंतिम चाचणी पूर्ण झाली असून तिचा मार्ग आणि धावण्याची घोषणा लवकरच केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद-मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत ही ट्रेन सुरू केली जाऊ शकते.
Trail run of Vande Bharat Express between Ahmedabad & Mumbai on @WesternRly @fpjindia pic.twitter.com/HB4TsEUpCe
— Kamal Mishra (@Yourskamalk) September 9, 2022
Vande Bharat Train Trail Successful
Mumbai Ahmedabad 100KM Speed Bullet Train