मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प या दोन रस्ते प्रकल्पांचेही त्यांनी उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी वंदे भारत ट्रेनमध्ये उपस्थित शाळकरी मुलांशी संवाद साधला. यादरम्यान एका विद्यार्थिनीने त्यांना एक गाणेही ऐकवले. विद्यार्थिनीचे गाणे ऐकून पंतप्रधान मोदीही तिचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. विद्यार्थ्याचे गाणे ऐकून पंतप्रधान मोदींनी वाह वाह असे उद्गार काढले आणि टाळ्या वाजवित तिला दाद दिली.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1624006818853974018?s=20&t=VVyeY7UpEFcGYCORcfRhPQ
Vande Bharat Train Student Sing a Song PM Modi Praises