मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्योजक गौतम अदानी यांच्या समुहातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ला आर्थिकदृष्ट्या भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिनाभरापासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरचा दर घसरत असून याचा फटका एलआयसीच्या गुंतवणुकीवर होत आहे.
अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालानंतर अदानी समूहातील लिस्टेड कंपन्यांचे शेअर दर ८० टक्क्यांनी घसरल्या आहेत. अदानी समूहात एलआयसीने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य आता ३३,१४९ कोटी रुपये इतकेच राहिले आहे. याचाच अर्थ एलआयसीच्या गुंतवणुकीवरील नफा जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा झाला आहे. अदानी समूहाच्या शेअर दरात अशीच घसरण कायम राहिल्यास एलआयसीची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. एलआयसीने ३० जानेवारी रोजी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे जाहीर केले होते.
https://twitter.com/jawharsircar/status/1629020350653820929?s=20
२७ जानेवारी रोजी या गुंतवणुकीचे मूल्य ५६,१४२ कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीच्या तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एलआयसीने अदानी समूहाच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये एसीसी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अंबुजा सिमेंट्स यांचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार, एलआयसीची एकूण मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन ४१.६६ लाख कोटी रुपये होती. एलआयसीने म्हटले होते की अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक त्यांच्या एकूण एयूएमच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
घसरण कायम
अदानी समूहाच्या दहापैकी आठ लिस्टटेड कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. यामुळे समूहाचे मार्केट कॅप २०,००० कोटी रुपयांनी कमी झाले. गेल्या एका महिन्यात अदानी समूहाचे मार्केट कॅप ६० टक्क्यांहून अधिक घसरून ७.३८ लाख कोटी रुपयांवर आले आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानी अनेक उपाय करत आहे. पण, आजपर्यंत त्याचा कोणताही परिणाम दिसला नाही.
https://twitter.com/priyankac19/status/1628980597921300486?s=20
Value of LIC’s investment in ADANI group turns negative