पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी झिरो प्लास्टिकचे उद्दिष्ट ठेऊन इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने “दुधाची रिकामी पिशवी द्या आणि हव त्या झाडाचे रोप घेऊन जा” असा उपक्रम राबवला जात होता. घराघरात जमा झालेल्या दुधाच्या रिकाम्या पिशव्यांचा रोपांसाठी वापर करण्यात आला आहेत. सध्या ते प्रयोगीक तत्वावर हा प्रयोग करणार असून या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अनेक नागरिक दुधाच्या रिकाम्या पिशव्या घेऊन झाडाचे रोप घेण्यासाठी रांगेत उभी होती. दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि काही पैसे दिले की आपल्या आवडीचे झाड येत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला होता.
कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांचा पुन्हा वापर होणार असल्याने निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबणार आहे. दुधाच्या रिकाम्या पिशवीला ४० पैसे प्रति नग असा दर असून पिशवी देऊन उर्वरित पैसे देऊन आपणास ४० विविध जातीच्या झाडांपैकी हवे ते झाड घेता येणार होते त्यामुळे प्रदूषण टाळून पर्यावरणाचे रक्षण झाले होते.
रोज सकाळी सर्वांच्या घरी रोज दूध वापरलं जातं. महिला व पुरूष पाकिटातून दूध काढून फेकून देतात. रिकामे पॅकेट घरात ठेवून आम्ही काय करू शकतो? पण दुधाचे रिकामे पॅकेट ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. अनेक घरगुती कामांसाठी याचा वापर करता येतो. रिकामी दुधाची पाकिटे वापरण्याच्या खुप फायदे आहेत.
दुधाचे पॅकेट खूप मजबूत असते. अशा स्थितीत, आपण ते वहीचे कव्हर म्हणून वापरू शकता. फक्त २ ते ३ दिवसांचे पॅकेट्स गोळा करायचे आहेत. यानंतर, तुम्ही वहीच्या आकारानुसार टेप किंवा ग्लूच्या मदतीने ही पॅकेट जोडू शकता. या स्टेप्सचे अनुसरण केल्यानंतर तुमचे कव्हर तयार होईल.
रिकाम्या दुधाच्या पॅकेटला तुम्ही फनेलचा आकार देखील देऊ शकता. तुम्हाला फक्त पॅकेटला फनेलच्या आकारात टेप करायचे आहे. यानंतर, तुम्ही या फनेलमध्ये फूड क्रीम किंवा मेहेंदी घाला आणि त्याचा वापर करा. रोज पॅकेट गोळा केल्यावर तुमच्याकडे भरपूर पॅकेट्स असतील. टेपच्या साहाय्याने ही पॅकेट्स जोडून तुम्ही मॅट बनवू शकता. जेवताना अन्न खाली पडू नये म्हणून चटई व्यतिरिक्त दुधाची रिकामी पाकिटे टाकून कव्हर बनवू शकता.
दुधाची रिकामी पाकिटे तुम्हाला उष्णतेपासून वाचण्यासाठी पंखा बनवण्यातही खूप मदत करू शकतात. तुम्हाला फक्त पॅकेटला चोकर किंवा वर्तुळाकार आकार देण्यासाठी एकत्र बांधायचे आहे आणि त्याभोवती कापड लावायचे आहे. आता पंखा तयार आहे. आता फक्त प्लास्टिक किंवा लाकडी काठीवर लावून त्याचा वापर करा. दुधाच्या पॅकेटमध्येही तुम्ही रोपेदेख लावू शकता. यासाठी तुम्हाला फक्त दुधाचे पॅकेट एका बाजूने पूर्णपणे कापायचे आहे. यानंतर या पॅकेटमध्ये माती टाकून रोप लावा. त्यामुळे प्रदूषण टाळून पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे.
Used Milk Plastic Bag Reuse Important Tips