India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पोस्टाची भारी योजना! दर महिना ५ हजार रुपये मिळवा आणि ५ वर्षांनी पूर्ण रक्कमही

India Darpan by India Darpan
September 20, 2022
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पैशाची योग्य गुंतवणूक हे एक मोठे आव्हान असते. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीचा उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता. तुम्हाला चांगला परतावाही मिळतो, या योजनेत गुंतवलेला पैसाही पूर्णपणे सुरक्षित असतो. त्यामुळे ग्राहकांचा याकडे कल वाढत आहे.

पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेतून गुंतवणूकदारांना फायदा होतो. त्यात महिनावार गुंतवणूक योजना लोकप्रिय आहे. या योजनेत दर महिन्याला कमाईची संधी मिळते. या योजनेत एकरक्कमी ९ लाख रुपये गुंतवल्यास, दर महिन्याला ५ हजार रुपये मिळवता येईल. तसेच ५ वर्षानंतर पूर्ण रक्कमही काढता येईल. MIS योजनेत सिंगल आणि ज्वाईंट खाते उघडता येते. सध्या अनेक गुंतवणूकदार रिटायरमेंटनंतर या योजनेत रक्कम गुंतवतात आणि फायदा मिळवत आहेत. पोस्ट खात्याची योजना असल्याने त्यात रक्कम बुडण्याचा कुठलाही धोका नाही.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये एकल खातेदार जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये गुंतवू शकतो. तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवणूक करता येते. संयुक्त खात्यात दोघांपेक्षा तिघांचाही सहभाग असू शकतो. परंतु, जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमवर सध्या ६.६​ टक्के वार्षिक परतावा मिळत आहे. योजनेत ९ लाख रुपये जमा केले तर ६.६ टक्के वार्षिक व्याजदराने एका वर्षात एकूण ५९,४०० रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्हाला मासिक
४९५० रुपये मिळतील. तर एकल खातेधारकाला ४ लाख ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २४७५ रुपये दर महिन्याला व्याज मिळेल.

मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी पोस्ट खात्यात बचत खाते असणे अनिवार्य आहे. खात्याचे केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकेड आधार कार्ड, पासपोर्ट अथवा मतदान कार्ड, वाहन परवाना आवश्यक आहे. २ पासपोर्ट साईज फोटो, पत्त्यासाठी वीज बिल अथवा इतर बिलाची प्रत आवश्यक आहे. त्यानंतर टपाल कार्यालयात जाऊन ‘पीओएमआयएस ‘ शी संबंधित अर्ज भरावा लागेल. त्याचप्रमाणे हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करावा लागेल. अर्ज भरतानाच वारसाचे नाव द्यावे लागेल . खाते उघडण्यासाठी १ हजार रुपयांची रोख अथवा धनादेश द्यावा लागेल. त्यानंतर एकरक्कमी पैसा गुंतवावा लागेल. परंतु त्याचा फायदा गुंतवणूकदारांना तथा ग्राहकांना चांगला मिळतो असे दिसून येते.

India Post Scheme Investment Monthly Investment Scheme Return Money
MIS


Previous Post

८९ वर्षांच्या पतीकडून सतत शरीरसुखाची मागणी; वैतागलेल्या ८७ वर्षांच्या पत्नीने अशी केली स्वतःची सुटका

Next Post

दुधाच्या रिकाम्या पिशव्या फेकू नका; फक्त हे करुन पहा…

Next Post

दुधाच्या रिकाम्या पिशव्या फेकू नका; फक्त हे करुन पहा...

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group