नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यूपीएससीने upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर परीक्षांविषयी नोटीस जारी केली आहे. त्यानुसार UPSC CSE २०२२ ची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२२मध्ये घेतली जाईल.
यूपीएससी परीक्षेचे २०२२चे संपूर्ण वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेबसाइटवरुन परीक्षार्थींना संपूर्ण यूपीएससी मुख्य २०२२वेळापत्रक डाउनलोड करता येणार आहे. यापूर्वी आयोगाने UPSC प्रिलिअम्स निकाल २०२२ जूनमध्ये प्रसिद्ध केला होता. यूपीएससी प्रिलिम्स २०२२ उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतात. यूपीएससीने निर्धारित वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ही १६, १७, १८, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी घेतली जाईल.
परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचीही लिंक वेबसाईटवर देण्यात आली आहे. यापूर्वी आयोगाने पूर्वपरीक्षेचा निकाल २०२२ जूनमध्ये जाहीर केला होता. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतात.
यूपीएससीने २२ जून २०२२ रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२२चा निकाल जाहीर केला होता. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी यूपीएससी मुख्य २०२२ फॉर्म जारी करण्यात आला. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना यूपीएससी मुख्य २०२२ प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. यूपीएससी प्रवेशपत्र upsc.gov.in वरून डाउनलोड करता येणार आहे.
UPSC Main Exam Schedule Declare