अयोध्या (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे नागरी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसरीकडे बसपने आपल्या दोन नेत्यांची हकालपट्टी केली. माजी मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे आणि याच गोष्टीमुळे बसपा सुप्रीमो मायावती नाराज झाल्या होत्या.
राजकिशोर हे बस्ती भागातील नावाजलेले नेते आहेत. ते तीन वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द बसपामधूनच सुरू केली. त्यानंतर ते सपामध्ये दाखल झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर डिंपल हेही राजकारणात सक्रिय आहेत. सपा सरकारमध्ये त्यांना ऊर्जा सल्लागारही करण्यात आले होते. नंतर दोघेही काँग्रेसमध्ये गेले.
2020 मध्ये पुन्हा बसपमध्ये प्रवेश केला होता. बस्तीचे बसपाचे जिल्हाध्यक्ष जयहिंद गौतम यांनी पत्र जारी करताना दोघांचीही बसपातून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे. अनुशासनहीन आणि पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येत आले. या दोन्ही नेत्यांनी अयोध्येत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
UP Politics Leaders Suspend BSP Eknath Shinde