मुंबई – राज्यात पुढील ३ दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वीजांच्या गडगडाटसह जोरदार वारे आणि माध्यम पाऊस काही तासांमध्ये पुणे, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर आणि विदर्भ या भागात पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात पुढील चार दिवस वादळी वार्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुरुवारी त्याबाबतचा इशारा दिला आहे. राज्यातील कोल्हापूरसह २४ जिल्ह्यांमध्ये पिवळा अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
९ ते १२ एप्रिल दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण राहील. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा दाह कमी होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात या चार दिवसांत वादळी वार्याह गारपीट व मुसळधार पाऊस होऊ शकतो. उर्वरित जिल्ह्यात मात्र मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
गडगडाटसह जोरदार वारे व विजा माध्यम पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता पुणे सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद बीड जालना अहमदनगर विदर्भ पुढच्या ३ तासात …. pic.twitter.com/4bUQPOgPzj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 10, 2021