इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ यांच्या सिंहासनावर बसण्याच्या ७० व्या वर्धापनदिन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. वडील किंग जॉर्ज सहावे यांचे अचानक निधन झाल्यानंतर एलिजाबेथ यांचा ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राज्याभिषेक करून सिंहासनावर विराजमान करण्यात आले होते. इंग्लंडच्या पूर्वेला असलेल्या सँड्रिघम येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पाहुण्यांमध्ये अँजेला वूड यांचाही समावेश होता. अँजेला यांनी १९५३ रोजी एक स्वयंपाकी विद्यार्थिनी म्हणून राज्याभिषेकाला चिकन, करी आणि मायनीचे रूचकर जेवण बनवण्यासाठी मदत केली होती.
बकिंघम पॅलेसतर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, फिकट निळा रंगाचा पोषाख परिधान करून महाराणी यांनी एका स्थानिक रहिवशाने बनवलेला केक कापला. तसेच बँडद्वारे वाजवलेले अभिनंदनपर गीत ऐकले. ब्रिटनच्या महाराणी म्हणून गेली ७० वर्षे राज्य करणाऱ्या एलिजाबेथ या वेळी म्हणाल्या, की “त्या प्रिंस चार्ल्स किंग म्हणजेच ते जेव्हा महाराज होतील, तेव्हा त्यांच्या पत्नी कॅमिला यांना महाराणी काँसर्ट (Queen Consort) ची उपाधी देणे पसंत करणार आहे”.
महाराणी एलिजाबेथ म्हणाल्या, की “जेव्हा वेळ येईल तेव्हा कॅमिला या क्वीन काँसर्ट म्हणून ओळखल्या जाव्यात, अशी माझी इच्छा आहे”. महाराणी एलिजाबेथ यांनी राज्याभिषेकाच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एका पत्रात ही बाब लिहिली आहे. चार्ल्स आणि कॅमिला यांचा २००५ साली विवाह झाला होता. राजघराण्याचे सदस्य म्हणून कॅमिला यांना मंजुरी देणे, असा एलिजाबेथ यांच्या घोषणेचा अर्थ होतो. ब्रिटनच्या एक हजार वर्षांचा इतिहास आणि परंपरेनुसार महाराजाची पत्नी स्वतः महाराणी होते. परंतु त्यांना कोणताही घटनात्मक अधिकार नसतो. विशेष म्हणजे, ब्रिटनचा राजा झाल्यानंतर कॅमिला या क्वीन काँसर्ट नव्हे, तर प्रिंसेस काँसर्ट असतील असे प्रिंस चार्ल्स यांनी यापूर्वी म्हटले होते.