मधूर गुजराथी, चांदवड
येथील छत्रपती शिवाजी चौकातील पुरातन श्री. विघ्नहर्ता गणोश मंदिराचा श्री.गणोश जयंतीला जिणोध्दार करण्यात आला. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सुंदर असे पिवळ्या मार्बल व संगमरवर मध्ये नक्षीदार असे मंदिर साकारले असून मंदिराच्या सभोताली भव्य असा सभामंडपाही झाला आहे. जमीनीपासून सुमारे 101 फुट उंच असलेल्या कळसाचे अवघड कळसाचे कळसारोहण तीन धाडसी गणोश भक्तांनी तीन तासात पुर्ण केल्याने त्यांचे या कार्याबद्दल कौतुक होत आहे.
दुपारी 12 वाजता चांदवड येथील विघ्नहर्ता मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा गणोश याग सुरु होता.या मंदिराचे कळसारोहण करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून तरबेज असे पट्टीचे शिखर चढाई करणा:या अनेक तरुणांना गणोश मंदिर ट्रस्टच्या ट्रस्टीनी पाचारण केले मात्र कोणीच कळसारोहणासाठी धजावत नव्हते.तर चांदवड शहरातील संतोष बडोदे, पंकज राऊत, बंटी पारवे या तिन गणोश भक्तांनी अवघड असे 101 फुट उंच अवघड कळसाचे कळसारोहण करण्याचा निर्धार केला व तीन तासात त्यांनी हे काम पुर्ण केले . हे मंदिर पुरातन असून या मंदिराची मोठी पडझड झाली होती. या मंदिराचे काम करण्यासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जगन्नाथ राऊत, गणु सोनवणो, नंदकुमार कोतवाल, सुभाष पवार, प्रकाश शेळके ,बापु पाटील, राजु जगताप, सचीन शिंदे ‘ राजू पवार सुधाकर बंबाळे व अनेक गणोश भक्तांनी निर्धार केला.
सन 2o13 मध्ये या मंदिराचे काम सुरु झाले तब्बल दोन ते तीन वर्षात पिवळ्या मार्बल व संगमरवरामध्ये हे कोरीव काम राजस्थान येथील कारगिरांनी पुर्ण केले. मात्र तब्बल नऊ वर्ष या मंदिरातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नव्हती. अखेर दि. 4 फेब्रुवारी 22 रोजी गणोश जयंतीचा मुर्हुतावर ही प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय गणोश भक्तांनी घेतला. व या मंदिराचा कळस सर्वात उंच असून ऐंशी फुटापर्यंत कळसावर चढण्यासाठी नक्षी व कपारी आहेत. मात्र वरचे सुमारे 21 फुट कळसावर चढणो अवघड होते.
या तीन साहसी तरुणांनी जीव धोक्यात टाकून कळसारोहण करण्याचा निर्णय घेतला. व तोही नाडा लावून पुर्ण केला. हे साहस बघण्यासाठी चांदवड शहरातील नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती.तर प्रत्येकांचा छातीचा ठोका गतीने वाजत होता. जस जसे हे तीन गणोश भक्त गणोश मंदिराचे कळसारोहणाकडे गेले तेव्हा अनेक भाविकांनी सुटकेचा नि:श्वासच सोडला. याच वेळी पोरोहित्य अमोल दिक्षीत व भूषण दिक्षीत , चंद्रेश्वर गडाचे महंत स्वामी जयदेवीपुरी महाराज यांनी मंत्रोउपचार करीत एकदाचा कळस चढताच सर्वानी आंनद व्यक्त केला तर या तिनही गणोश भक्तांचा सत्कार ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.