शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्रीय मंत्री दानवेंनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दानवे म्हणाले…

डिसेंबर 5, 2022 | 11:59 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
raosaheb Danve

 

औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ रविवारी प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्यावर टिकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. याबाबत आता दानवेंनी खुलासा केला आहे. संबंधित व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या प्रकरणी खुलासा करताना दानवे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी एकेरी भाषेचा उल्लेख केल्याचं वृत्त दाखवण्यात आलं. मी त्याबद्दल खुलासा करू इच्छितो. दोन वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांनी मला राज्यपालांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्या काळात अनावधानाने माझ्याकडून अशाप्रकारे एकेरी उल्लेख केला गेला होता. तेव्हासुद्धा माझ्याविरोधात टीकेची झोड उठली होती. त्यावेळी मी माफीही मागितली होती. विषय मिटला होता. आज पुन्हा तो व्हिडिओ दाखवला जात आहे. ती घटना काल किंवा आज घडली, असं पसरवलं जात आहे. मी आपल्याला खुलासा करू इच्छितो. त्या वक्तव्याची माफी मी तेव्हा मागितली होती. आजही मागतो. आज अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य मी केलेलं नाही”, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध राज्यभरातून होत आहे. त्यानंतर भाजपाचे सुधांशु त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा यांनीही एकापाठोपाठ एक वक्तव्ये केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना भाजपा पाठिशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील भाजपाला इशारा दिला आहे. शनिवारी रायगडावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल, अशा शब्दात सरकारला सुनावले. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना याबाबत एक पत्रही पाठवले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता राष्ट्रपती या पत्राची दखल कशी घेतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/BodkheShilpa/status/1599385069868974080?s=20&t=aDEZx8QtqAfJG1_kCpVtQA

Union Minister Raosaheb Danve Chhatrapati Shivaji Maharaj Statement

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजकारण! जळगावात खुद्द खडसेंविरोधात सून मैदानात; अशा रंगताय प्रचार सभा

Next Post

समृद्धी महामार्ग ११ डिसेंबरपासून होणार खुला; द्यावा लागणार एवढा टोल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Samruddhi Mahamarga Highway

समृद्धी महामार्ग ११ डिसेंबरपासून होणार खुला; द्यावा लागणार एवढा टोल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011