India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ना पेट्रोल, ना डिझेल, ना सीएनजी… ना इलेक्ट्रिक… नितीन गडकरींकडे आहे ही कार…. इंधनासाठी येतो त्यांना एवढा खर्च (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
February 13, 2023
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आघाडीचे नेते, अभिनेत्यांच्या आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना फार कुतुहल असते. त्यांच्या आवडी-निवडी, कोणत्या वस्तु वापरतात, जीवनशैली याबाबत जाणून घेण्यासाठी सारेच उत्सूक असातात. आज आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भूरळ घालणाऱ्या कार बद्दल आपल्याला माहिती देणार आहोत.

देशात झपाट्याने माहामार्गांचा विस्तार करणारे नेते म्हणून नितीन गडकरी यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांना वाहन आणि नवनविन तंत्रज्ञानाबाबत जाणून घेण्याची फार आवड असल्याचे आपण सारेच जाणतो. इंधन आयातीसाठी होणाऱ्या खर्चाबाबत ते नेहमीच चिंता व्यक्त करतात. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर चालणाऱ्या गाड्यांवरही ते भर देत आहेत. स्वतः नितीन गडकरी टोयोटा मिराई सेडानचा वापर करतात. एकदा ते या कारमधून संसदेत येतानाही दिसले आहेत. विशेष म्हणजे ही हायड्रोजनवर चालणारी कार आहे. टोयोटाने गेल्या वर्षी ही डेमो कार म्हणून सादर केली असून नितीन गडकरी यांच्याकडे ही कार चाचणी स्वरूपात आहे.

हायड्रोजन कारचा आग्रह
सध्या आपण 8 लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो. आत्मनिर्भर देश बनायचे असेल, तर भारतात हायड्रोजनवर आधारित इंधनाचे उत्पादन करणे आवश्यक आहे, असे ते नेहमीच तळमळीने सांगतात. हायड्रोजन कारच्या वापरावर ते भर देतात. हायड्रोजन कारचा खर्च केवळ 1.5 ते 2 रुपये प्रति किमी आहे.

646 किमीचा प्रवास
टोयोटा मिराई हायड्रोजन इंधन सेल टेक्नॉलॉजीवर काम करते. त्यात हायड्रोजन टाकी आहे, ज्याचा गॅस ऑक्सिजनसह रिएक्शन करून वाहनाला गती मिळते. यामध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देखील आहे, जी 182 PS पॉवर आणि 406 Nm टॉर्क जनरेट करते. यात 1.24 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. यात 5.2 किलोग्रॅम क्षमतेची हायड्रोजन टाकी आहे. टाकी भरली की ही कार 646 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Green Hydrogen is the future of the country!#Urjadata_Kisan #ऊर्जादाता_किसान pic.twitter.com/Shk2onuoWQ

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 13, 2022

Union Minister Nitin Gadkari Car Features Video


Previous Post

आमदाराची तुरुंगातही रोज रात्री पत्नीसोबत ‘खास’ भेट : पोलिसांच्या छाप्यात उघड झाली ही धक्कादायक माहिती

Next Post

खासदार जया बच्चन जोरदार ट्रोल…. कुणी अक्कल काढली…. कुणी संस्कार…. तर कुणी आणखी काही… (व्हिडिओ)

Next Post

खासदार जया बच्चन जोरदार ट्रोल.... कुणी अक्कल काढली.... कुणी संस्कार.... तर कुणी आणखी काही... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group