नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आघाडीचे नेते, अभिनेत्यांच्या आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना फार कुतुहल असते. त्यांच्या आवडी-निवडी, कोणत्या वस्तु वापरतात, जीवनशैली याबाबत जाणून घेण्यासाठी सारेच उत्सूक असातात. आज आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भूरळ घालणाऱ्या कार बद्दल आपल्याला माहिती देणार आहोत.
देशात झपाट्याने माहामार्गांचा विस्तार करणारे नेते म्हणून नितीन गडकरी यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांना वाहन आणि नवनविन तंत्रज्ञानाबाबत जाणून घेण्याची फार आवड असल्याचे आपण सारेच जाणतो. इंधन आयातीसाठी होणाऱ्या खर्चाबाबत ते नेहमीच चिंता व्यक्त करतात. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर चालणाऱ्या गाड्यांवरही ते भर देत आहेत. स्वतः नितीन गडकरी टोयोटा मिराई सेडानचा वापर करतात. एकदा ते या कारमधून संसदेत येतानाही दिसले आहेत. विशेष म्हणजे ही हायड्रोजनवर चालणारी कार आहे. टोयोटाने गेल्या वर्षी ही डेमो कार म्हणून सादर केली असून नितीन गडकरी यांच्याकडे ही कार चाचणी स्वरूपात आहे.
हायड्रोजन कारचा आग्रह
सध्या आपण 8 लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो. आत्मनिर्भर देश बनायचे असेल, तर भारतात हायड्रोजनवर आधारित इंधनाचे उत्पादन करणे आवश्यक आहे, असे ते नेहमीच तळमळीने सांगतात. हायड्रोजन कारच्या वापरावर ते भर देतात. हायड्रोजन कारचा खर्च केवळ 1.5 ते 2 रुपये प्रति किमी आहे.
646 किमीचा प्रवास
टोयोटा मिराई हायड्रोजन इंधन सेल टेक्नॉलॉजीवर काम करते. त्यात हायड्रोजन टाकी आहे, ज्याचा गॅस ऑक्सिजनसह रिएक्शन करून वाहनाला गती मिळते. यामध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देखील आहे, जी 182 PS पॉवर आणि 406 Nm टॉर्क जनरेट करते. यात 1.24 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. यात 5.2 किलोग्रॅम क्षमतेची हायड्रोजन टाकी आहे. टाकी भरली की ही कार 646 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
Green Hydrogen is the future of the country!#Urjadata_Kisan #ऊर्जादाता_किसान pic.twitter.com/Shk2onuoWQ
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) October 13, 2022
Union Minister Nitin Gadkari Car Features Video