रविवार, नोव्हेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयांचे अमित शाह यांनी केले स्वागत…

सप्टेंबर 18, 2024 | 11:18 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
amit shah11


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांचे स्वागत केले आहे.’X’ या समाज माध्यमावरील पोस्टच्या मालिकेत गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात परिवर्तनात्मक सुधारणा घडत आहेत.

एक देश एक निवडणुकीवरील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमुळे, भारताची ऐतिहासिक निवडणूक सुधारणांच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. यामधून निकोप आणि आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम निवडणुकांद्वारे आपल्या लोकशाहीला बळ देण्याचा आणि संसाधनांच्या अधिक उत्पादक वाटपाद्वारे आर्थिक विकासाला गती देण्याचा पंतप्रधान मोदी यांचा दृढ निश्चय दिसून येतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शेतकऱ्यांचे कल्याण आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या संधींना प्रोत्साहन देणे ही मोदी 3.0 ची सर्वोच्च प्राथमिकता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी ₹24,475 कोटी खर्चाच्या ‘पोषण मूल्यांवर आधारित अनुदान योजने’ला मंजुरी दिली. यामुळे शेतकऱ्यांना फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खते सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याबरोबरच खतांच्या संतुलित वापरालाही प्रोत्साहन देईल. या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायला सदैव तत्पर असलेल्या पंतप्रधान मोदी यांचे आभार.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलत, शेतकरी-स्नेही मोदी सरकारने आज ₹35000 कोटी खर्चाच्या ‘पीएम अन्नदाता आय संरक्षण अभियानाला (PM-AASHA)’ मंजुरी दिली.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाजवी दर मिळण्यासोबतच, पीएम आशा (PM-AASHA) ग्राहकांना उपलब्ध असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या भावातील चढउतार नियंत्रित करायला सहाय्य करेल. यामुळे कडधान्ये, तेलबिया आणि कृषी-बागायती उत्पादनातही शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता वाढेल. आदिवासी समाजाचे सक्षमीकरण हा पंतप्रधान मोदी यांचा संकल्प असून त्या दिशेने वेगाने काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 63,000 आदिवासी खेड्यांमध्ये 100% मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ₹79,156 कोटी खर्चाच्या ‘प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली. 5 कोटी आदिवासी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या गावातील पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील विकास कामांना आणखी गती मिळेल.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) साठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या (एनसीओई) मान्यतेने, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र लक्षणीय झेप घेण्यास सज्ज आहे. या उपक्रमामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करताना भारताची जागतिक बौद्धिक संपदा मजबूत होईल. या दूरदर्शी पाऊलाबद्दल मोदीजींचे आभार.

आज केंद्रीय मंत्रिमंडळात जैवतंत्रज्ञान संशोधन नवोपक्रम आणि उद्योजकता विकास योजनेला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अमित शाह यांनी आभार मानले. ते म्हणाले की, ही योजना आपल्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या भावनेची जोड देत नवीन उर्मी निर्माण करेल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळात चार परिवर्तनात्मक प्रकल्पांना मंजुरी देऊन अंतराळ क्षेत्रातील भारताच्या नवीन महत्त्वाकांक्षेचा शुभारंभ केला. चांद्रयान 4 मोहीम आणि व्हीनस ऑर्बिटर मोहीम चंद्र आणि शुक्राबाबतच्या आपल्या ज्ञानाची कक्षा विस्तृत करेल, तर गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणारे भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस), अंतराळ क्षेत्रात भारताचे नेतृत्व मजबूत करेल. ते पुढे म्हणाले की, पुन्हा वापरता येण्याजोगे कमी किमतीचे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (एनजीएलव्ही) भारतीय अंतराळ स्थानक बांधण्याचे आणि 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याची क्षमता विकसित करण्याचे भारताचे स्वप्न साकार करण्यास गती देईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पार्किगमध्ये गप्पा मारत उभ्या असलेल्या सोसायटी सदस्यांवर चाकू हल्ला…पंचवटी परिसरातील घटना

Next Post

महाराष्ट्राचे इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा? शरद पवार गटाच्या या नेत्याचा आरोप

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Untitled 59

महाराष्ट्राचे इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा? शरद पवार गटाच्या या नेत्याचा आरोप

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011