येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील सुरेगाव रास्ते येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. शेतातील विहिरी जवळ असलेले मधाचे मोहोळ काढण्यासाठी गेलेला १२ वर्षीय बालक ऋषीकेश गजानन चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेला. विहीरीजवळील मधाचे मोहोळ काढण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याचवेळी मधमाशा त्याच्यामागे लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्याचवेळी विहिरीच्या कठड्यावरुन त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो विहिरीत पडला. या दुर्घटनेत ऋषीकेशचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ४ पर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. तो विहिरीत पडल्याच लक्षात आले. त्यानंतर विहिरीतून पाणी उपसल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.