मुंबई – वेगवेगळ्या ठिकाणी पुराव्यांकरिता भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड ही अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानले जाते. आतापर्यंत यूआयडीएआय आधार कार्डधारकांच्या सोयीसाठी कोणत्याही पुराव्याशिवाय पत्ता अपडेट (अद्ययावत) करण्याची सुविधा देत होते, आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. परंतु ऑनलाइन पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ही सेवा उपलब्ध होणार आहे.
यूआयडीएआयने ट्वीट केले की, अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर सुविधा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच ट्वीटमध्ये, म्हटले आहे की, आपला पत्ता अद्ययावत करण्यासाठी सूचीमध्ये दिलेल्या वैध पीओए दस्तऐवजांपैकी कोणतेही एक निवडण्यास सांगितले गेले. ही सेवा बंद झाल्यामुळे, ज्या लोकांकडे पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत त्यांना आधारमध्ये त्यांचा पत्ता अपडेट करणे कठीण होईल. परंतु त्यासाठी ऑनलाईन पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आधार कार्डवरील ऑनलाईन पत्ता याप्रमाणे बदलता येईल…
1- थेट यूआयडीएआय लिंक ssup.uidai.gov.in/ssup/ वर लॉग इन करा.
2- यानंतर ‘प्रोसीड टू अपडेट अपडेट’ वर क्लिक करा.
3- आता 12 अंकी युडीआय (UID ) क्रमांक टाका.
4- यानंतर दिलेला सुरक्षा कोड प्रविष्ट करा.
5- आता पाठवा ओटीपी (OTP ) पर्यायावर क्लिक करा.
6- यानंतर तुमच्या आधार कार्डासह नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
7- ओटीपी मिळाल्यानंतर, तो प्रविष्ट करा आणि लॉगिनवर क्लिक करा.
8- येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा तपशील दिसेल. येथे तुम्हाला सुचवलेल्या विविध दस्तऐवजांपैकी कोणतेही एक आयडी आणि पत्ता पुरावा निवडून सबमिट करावे लागेल.