बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशातील वाहन बाजाराला झळाळी: या वाहनांची जोरदार होणार विक्री

by India Darpan
ऑगस्ट 22, 2021 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
E82DVS7XEAA7rqE

मुंबई – सध्या भारतीय बाजारपेठेत नवनवीन अत्याधुनिक वाहने दाखल होत आहेत. त्यामुळे वाहन क्षेत्रासाठी सध्याचा सण-उत्सवांचा काळ अतिशय उत्साहवर्धक असणार आहे. दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि महिंद्राची बहुप्रतिक्षित शक्तिशाली एसयूव्ही XUV700 ही दोन नवीन वाहने बाजारात दाखल झाली आहेत. ही बाब बाजारपेठेला मोठा उत्साह देणारी आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर
देशातील आघाडीची कॅब सेवा देणारी कंपनी ओलाने पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या स्कूटरचे बुकिंगही सुरू झाले आहे. या स्कूटरला बूट स्पेस, अॅप-आधारित कीलेस अॅक्सेस आणि सेगमेंट-लीडिंग रेंज मिळणार आहे. तसेच ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर १५० किमीपर्यंत प्रवास करेल. तसेच १०० किमी प्रति तासाचा टॉप स्पीड असू शकेल. एवढेच नाही तर ही स्कूटर फक्त १८ मिनिटात ० ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. कंपनी या स्कूटरशी संबंधित विविध माहिती सोशल मीडियाद्वारे समोर आणत आहे. ही स्कूटर १० रंगांमध्ये उपलब्ध आहे.  याशिवाय यात रिव्हर्स ड्रायव्हिंग मोड देखील दिला जाईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर पारंपारिक डीलरशिप नेटवर्कशिवाय देशभरातील ग्राहकांना घरपोच दिली जाईल.

महिंद्रा XUV700
महिंद्रा अँड महिंद्रा आपली नवीन महिंद्रा XUV700 देशांतर्गत बाजारात लॉन्च झाली आहे. या कंपनीने आपला नवीन लोगो सादर केला आहे, जो पहिल्यांदाच या SUV मध्ये सर्वात शक्तिशाली असेल. या वाहनांत पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनचे पर्याय बाजारात आणले आहेत. या कंपनी SUV मध्ये अनेक क्लास लीडिंग फीचर्स ऑफर केली आहे. या एसयूव्हीमध्ये स्मार्ट डोअर हँडल्सचा वापर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, सुरक्षा अलार्म प्रणाली देखील देण्यात आली आहे. यामुळे चालकाला अतिवेगाने वाहन चालवण्यास अलार्मद्वारे सतर्क करून प्रतिबंधित करण्यात येते.

सिंपल एनर्जी मार्क २ इलेक्ट्रिक स्कूटर
बंगळुरू स्थित स्टार्टअप कंपनी सिंपल एनर्जी देखील आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करेल. सदर स्कूटर ही एका चार्जमध्ये २४० किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज प्रदान करेल. एवढेच नाही तर ही स्कूटर वेगाच्या बाबतीतही खूप चांगली असेल. कारण ही स्कूटर फक्त ३.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम असून त्याचा टॉप स्पीड १०० किमी प्रति तास आहे. सदर स्कूटर सामान्य होम चार्जरसह फक्त ४० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे १ तास ५ मिनिटे लागतात. याशिवाय यात फास्ट चार्जिंग सिस्टीम देखील दिली जाऊ शकते, त्यामुळे या स्कूटरची बॅटरी फक्त २० मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. कंपनी ही इलेक्ट्रिक स्कूटर १ लाख १० हजार ते १ लाख २० हजाराच्या किंमतीत देऊ शकते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची ही सुविधा केली बंद; हा आहे पर्याय

Next Post

असे आहे रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमेचे महत्त्व

India Darpan

Next Post
IMG 20210822 WA0001

असे आहे रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमेचे महत्त्व

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011