नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) प्रमुखांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, सहाय्यक प्राध्यापकपदासाठी आता पीएचडीची आवश्यक नाही. एका कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र, या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उस्मानिया युनिव्हर्सिटी (OU) कॅम्पसमध्ये UGC-HRDC इमारतीचे उद्घाटन करताना, UGC प्रमुख प्रा एम जगदेश कुमार म्हणाले की, UGC NET पात्र उमेदवार हे विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर भरतीसाठी थेट अर्ज करू शकतात. पीएचडीची पात्रता असणे ही त्यांच्यासाठी कोणतीही सक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यूजीसी प्रमुखांच्या विधानाचा हवाला देत ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात आला आहे की, सहाय्यक प्राध्यापकाच्या नोकरीसाठी, उमेदवारांना पीएचडी असणे आवश्यक नाही. कारण यूजीसी नेटची पात्रता म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा स्वीकारली जाईल. या संदर्भात अधिकृत सूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही परंतु उमेदवारांना नवीनतम माहितीसाठी UGC वेबसाइट किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हजारोंना दिलासा
आत्तापर्यंत, नियमित प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक म्हणून भरतीसाठी पीएचडी आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांमुळे हजारो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. UGC लवकरच याबद्दल तपशीलवार माहिती शेअर करेल अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी, पदव्युत्तर पदवी आणि UGC NET पात्रता असलेले उमेदवार आता देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील.
UGC Chief Big announcement for PhD Compulsion