मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधक भाजपचा चांगलाच समाचार घेतला. खासकरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगली टीका केली. ठाकरे म्हणाले की, अमली पदार्थांचे काही जणांना व्यसन असते. पण, सतत सत्ता हवी असणं हा सुद्धा अमली पदार्थच आहे. आपलाच अमल सगळीकडे रहावा हा त्यामागचा उद्देश आहे. पुढच्या महिन्यात आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले, मी तर आज पण सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा, असे खुले आव्हानच ठाकरे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपला दिले आहे. बघा व्हिडिओ
https://twitter.com/OfficeofUT/status/1449035910142574597